नोकरीं करावी कि व्यवसाय करावा ?

नोकरीं करावी कि व्यवसाय करावा ?

नमसकार मित्रांनो,
नोकरी करावी कि व्यवसाय करावा हा अवघड आणि गोंधळून टाकणारा प्रश्न नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.
काहींच्या आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात असताना येतो तर काहींच्या नोकरी किंवा व्यवसाय करत असताना हा प्रश्न सतावत असतो. तर आता आपण या दोन्ही गोष्टीची सविस्तर चर्चा करूया म्हणजे या माहितीच्या आधारे तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.

सर्वप्रथम आपण नोकरीचे फायदे आणि तोटे पाहूया

) नोकरी :-

फायदे
१ – नोकरी हि नेहमी सुरक्षित असते.
२ – नोकरीमध्ये आयुष्य एकदम मस्त सुरु असते.
३ – उत्पन्नाचा / पैशाचा विचार केला तर पगार वेळेवर आणि ठरल्याप्रमाणे मिळतो.
४ – काम चांगले केले तर प्रमोशन मिळतात आणि पगारहि वाढतो.
५ – धोका कमी असतो किंवा नसतोच असे म्हणायला काही हरकत नाही.
६ – कामाचे तासहि कमी आणि ठरल्याप्रमाणेच असतात.
७ – काम आणि आयुष्य ( FAMILY LIFE ) एकदम समतोल राखून असते.

तर आता आपण पाहूया नाण्याची दुसरी बाजू……..
नोकरीचे तोटे
१ – बॉस च्या नजरेखाली काम करावे लागते.
२ – काही कारणास्तव जॉब जाण्याची शक्यता असते.
३ – हवा तेव्हा आणि हवी तेवढी मोकळिकता/सूट मिळत नाही.
४ – कंपनीची अवस्था जर खराब असेल तर काम जास्त आणि पगार कमी भेटतो.
५ – कामामध्ये स्वतःची कल्पकता जास्त वापरू शकत नाही.

हे सर्व तोटे जरी असले तरी काही लोकांनी नोकरीच्या माध्यमातून खूप प्रतिष्ठा आणि पैसे दोन्ही पण मिळवले आहे……

उदाहरणार्थ:-
१) नाव              =  टीम कूक ( TIM COOK )
कंपनी चे नाव     =  APPLE चे सीईओ
पगार ( डॉलर )  =  १०.२८ मिलियन
पगार ( रुपये )   = ७५,३७,८१,०००.०० /-

२) नाव                   = सत्या नाडेला
कंपनी चे नाव          = मायक्रोसॉफ्ट चे सीईओ
पगार (डॉलर मदे )   =  १८.२० मिलियन
पगार ( रुपीस )       = ,३३,४५,१५,०००.०० /-

३) नाव                  = सुंदर पिचाई
कंपनी चे नाव         = गुगल चे सीईओ
पगार (डॉलर मदे )  = १५० मिलियन
पगार ( रुपीस )      = १०,९९,८७,५०,०००.०० /-

आता आपण पाहू व्यवसायाची माहिती,

) व्यवसाय ( BUSINESS ) :-

फायदे :-
१ – व्यवसायामध्ये तुम्हीच तुमचे बॉस असता त्यामुळे मोकळिकता मिळते.
२ – निर्णय घेण्याची संधी तुमच्या हातात असते.
३ – अफाट पैसे कमावण्याची क्षमता असते.
४ – समाजामध्ये तुमची एक चांगली प्रतिमा तयार होते.
५ – काही वेळा कमी वेळेमध्ये जास्त प्रगती होते किंवा जास्त पैसे कमाऊ शकतो.
६ – स्वतःच्या नियमानुसार काम करता येते.
७ – स्वतःची मानसिक आणि बौद्धिक प्रगती होते.
८ – तुमच्या सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पना सत्यात उतरवू शकता.
९ – मोठी कंपनी करून लोकांना नोकऱ्या देऊ शकता.
१० – आपला बिझनेस मोठा करून पुढच्या पिढीला तो सोपवू शकता.
११ – तुमच्या क्षेत्रात चांगले काम करून समाज आणि देश घडवण्यास हातभार लावू शकता.

व्यवसायाचे तोटे :-
१ – नुकसान होण्याचा जास्त धोका असतो.
२ – वेळेचे बंधन नसते पण व्यावसायिक साधारणतः नोकरदारापेक्षा २ ते ३ पट जस्ट काम करतो.
३ – यश मिळते पण खूप प्रयत्न करावे लागतात.
४ – बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतात.

उदाहरणार्थ:-
१ – नारायण मूर्थी { इन्फोसिस }
२ – बींनी बन्सल आणि सचिन बन्सल {flip-kart}
३ – स्टीव्ह जॉब्स { APPLE }
४ – मार्कक्स झुकेरबर्ग {Facebook}
हे सर्व महान पिढीचे श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक आहेत.

तर मित्रानो आतापयंत आपण बिझनेस आणि नोकरी या विषयी माहिती घेतली, आता आपण यामधील एक मार्ग कसा निवडायचा म्हणजेच निर्णय कोणत्या गोष्टींच्या आधारे घ्यायचा ते आपण पाहू.

तुमची व्यक्तिमत्व ( PERSONALITY ) आणि धोका ( RISK ) पत्करण्याची क्षमता हे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत.
जर तुमच्यामध्ये…………

१ – धोका पत्करण्याची क्षमता/सवय आहे.
असे म्हणतात कि जीवनामदे धोका पत्नकाराने हाच एक मोठा धोका आहे
२ – नेतृत्व करायला आवडते.
३ – जास्त काम ( HARD WORK ) करण्याची इच्छा आहे.
४ – मिळून मिसळून ( TEAM WORK ) काम करणे यावर विश्वास आहे.
५ – अवघड /कठीण गोष्टी सोप्या करण्याची कला आहे.
६ – लोकांच्या अडचणी सोडवायला आवडते.
७ – सकारात्मक विचार आणि स्व:प्रेरणादायी असणे.
८ – समाजामध्ये किंवा उद्योगांमधें कामाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याची जाणीव असणे.

जर मित्रानो या सर्व गोष्टी तुमच्या मदें असतील तर तुम्ही नक्कीच व्यवसाय सुरु केला पाहिजे आणि जर काही वैशिष्ट्ये कमी असतील पण व्यवसाय करण्याची जबर इच्छा असेल तर तुम्ही हे शिकू शकता / मिळवून शकता तर अजजपासूनच कमला लागा.

{ यासाठी बिझनेस बाबा नेहमी तुमच्या सोबत आहे }

आणि याउलट तुम्हाला ………………

१ – सुरक्षित कवचामध्ये राहायला आवडते.
२ – तुमचे हृदय कमकुवत आहे.
३ – निर्णय घेणे अवघड जाते.
४ – धोका पत्करायला आवडत नाही.
५ – नेतृत्व करायला आवडत नाही.
तर अश्या लोकांनी सुरक्षी नोकरी करावी आणि सुंदर पिचाई, सत्यम नडेला यांच्यासारखे काम करून यश मिळवावे.

मी परत एकदा सांगतो जे नोकरी करत आहेत आणि स्वतःचा व्यवसाय करायची जबर इच्छा आहे त्यांनी यशस्वी उद्योजकाची जी काही वैशिष्टये आहेत त्यांचा अभ्यास करा आणि काम करायला सुरुवात करा.

” PERFECT PRACTICE MAKE’S MAN PERFECT “

म्हणजेच चांगल्या सरावासाठी FREE LANCING / नेटवर्क मार्केटिंग ( NETWORK MARKETING ) किंवा ONLINE बिझनेस करायला सुरुवात करा, तुमचे स्किल तपासून पहा, अनुभव घ्या.

कृती करा ….कृती करा ….कृती करा ….(TAKE ACTION – AT ANY COST)

थोडक्यात काय तर तुमच्या ध्येयाकडे एक एक पायरी पुढे जा…!!!

याठिकाणी मला निर्णय या शब्दावरून महान उद्योजक यांचे एक उदगार आठवले…..

“I DON’T TAKE RIGHT DECISIONS,

I TAKE DECISION & MAKE THEM RIGHT”
BY “RATAN TATA”

मी बरोबर निर्णय घेण्यात वेळा घालवत नाही,

तर मी निर्णय घेतो आणि जर ते चुकले तर ते बरोबर करतोच

मित्रानो तुम्ही मला जर माझे मत विचारलं तर ते नक्कीच  बिझनेस  असे असेल.

प्रश्न :- तुमचा निर्णय काय आहे ??

ते मला खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहून पटवा…….

जास्त गोंधळून न जाता कृती करायला सुरुवात करा, प्रगती करण्यासाटी बिझनेस बाबा बरोबर जॉईन व्हा आणि तुमची ध्येय पूर्ण करा.

मी अशी अश्या व्यक्त करतो कि हि माहिती तुम्हा सर्वांना उपयोगी पडली असेल, आणि जर तसे असेल तर हि माहिती इतर लोकांना पर्यंत पोहोचवण्यास “बिझनेस बाबा” ला मदत कराल अशी अमी इच्छा व्यक्त करतो.

धन्यवाद …..!!!

Leave a Reply