नॉलेज कॅपिटल बिझनेस म्हणजे काय ?

नॉलेज कॅपिटल बिझनेस म्हणजे काय ?

माझ्या उद्योजक मित्रानो आज “आपण नॉलेज कॅपिटल बिझनेस” म्हणजे काय ते पाहणार आहोत.

सर्वप्रथम आपण याचे फायदे पाहूया :-

१) तुम्ही स्वतः एक ब्रँड बनता.

२) ग्रहांकांच्याबरोबर तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतात.

३) प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही रोजगार निर्मिती करता, शिवाय उद्योजकतेला बढावा देता.

४) ग्राहकांचा तुमच्या कंपनीवरचा विश्वास वाढतो.

५) असे म्हटले जाते कि…

“TEACHING IS THE BEST WAY OF LEARNING”

म्हणजेच जेव्हा तुम्ही लोकांना प्रशिक्षण देता तेव्हा त्या विषयातील तुमचे ज्ञान देखील अधिक वाढते.

६) यामध्ये तुम्हाला योग्य ग्राहक भेटतो आणि त्याचबरोबर उत्पन्न देखील होते.

 तर मित्रानो आता आपण हे ज्ञान विकायचे कसे ते पाहूया.

मित्रानो तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला वेगवेगळे प्रॉडक्ट म्हणजेच कोर्सेसमध्ये रूपांतर करा.

थोडक्यात काय तर नेमके कसे विकायचे याची प्रणाली तयार करा.

आता आपण याची काही उदाहरणे पाहू

१) वन टू वन विकणे. (एका वेळी एकाच ग्राहकाला विकणे )

२) वन टू मेनी विकणे. (एका वेळी अनेक ग्राहकाला विकणे )

३) प्रशिक्षण देऊन विकणे.

४) व्यवसायाची भागीदारी करून विकणे.

५) ऑनलाईन कोर्सेस मध्ये रूपांतर करून विकणे. (Passive Income )

६) पुस्तके व ऑडिओ तयार करून विकणे.

तर अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे ज्ञान विकू शकता.

हे सर्व करण्यासाठी काही पूर्व तयारी करावी लागेल ते पाहू.

१) तुमच्या क्षेत्रामध्ये काम करावयाच्या लोकांचा अभ्यास करा.

२) तज्ञ लोकांकडून माहिती मिळवा.

३) गरजेच्या आणि महत्वाच्या माहितीच्या आधारे चांगले कोर्सेस तयार करा.

४) तुमच्या विषयाचा सखोल अभ्यास करा.

५) प्रामाणिकपणे ज्ञान दुसऱ्यांना देण्याच्या भावनेने काम करा.

६) उत्तम बोलण्याची कला अवगत करा.

७) तुमच्या साधरीकरणामध्ये कल्पकता आना.

८) चांगल्या लोकांशी संबंध प्रस्थापित करा.

९) लोकांना प्रशिक्षण द्या आणि त्यांच्या अडचणी सोडवून तुम्ही तुमचे ज्ञान वाढावा.

१०) भरपूर पैसे कामविण्यास तयार रहा.

आजचा विशेष प्रश्न :-

मित्रानो तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात ते मला कंमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.

“बिझनेस बाबा”

“लोकांना सक्षम करणे, सक्षम समाज घडविणे”

धन्यवाद…!!!

1 Comment

  1. great content..

    Reply

Leave a Reply