नवीन बिझनेस आयडिया कश्या शोधायच्या ?

नवीन बिझनेस आयडिया कश्या शोधायच्या ?

नमस्कार मित्रानो,

बऱ्याच नवीन आणि जुन्या उद्योजकांना हा प्रश्न पडतो कि नवनवीन बिझनेस आयडिया कुठून आणायच्या किंवा कश्या शोधायच्या ???

काही एक्स्पर्ट लोकांनी सांगितल्या प्रमाणे आपण काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत, तर त्या सवयी कोणात्या ते पाहू…..

१ – एक नोट पॅड आप मोबाईलमध्ये हवे किंवा एक पॉकेट डायरी आणि पेन नेहमी तुमच्या  जवळ पाहिजे.  ( थोडक्यात काय तर लिहिण्याची सवय लावून घ्या )

२ – जेव्हा-जेव्हा तुम्हाला काही नवीन गोष्टी सुचतील किंवा पहायला  मिळतील  तेव्हा-तेव्हा त्या डायरी मध्ये लिहून ठेवा.

३ – रोज कमीत-कमी  १० किंवा जास्तीत-जास्त २० बिझनेस आयडिया लिहिण्याचा कटाक्ष पाळा.

सुरवातीला तुम्हाला ते अवघड वाटेल पण तुम्ही जर ते सतत करत राहिलात तर तुमच्या मेंदूला चालना मिळेल, हळू हळू तुमची शोधक बुद्धी वाढेल  तसेच मेंदूला याची सवय होऊन जाईल   त्यामुळे कालांतराने तुमची उद्योजकतेची मानसिकता  ( BUSINESS MINDSET )  तयार होते आणि सगळीकडेच तुम्हाला बिझनेस आयडिया दिसायला लागतील.

तसेच जेव्हा तुम्ही एखादी आयडिया लिहीत असाल तर थोडावेळ  त्या विषयावर विचार करा, चिंतन करा आणि मग सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा सर्व आयडिया वाचून पहा म्हणजे तुमचे उद्धिष्ट लवकर  साध्य  होईल.

– तुम्हाला  हे ऐकून कुतूहल  वाटेल कि बिझनेस आयडिया या नेहमीं आपल्या आसपासच म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्येच असतात फक्त तुमचा तसा बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे.

– रोजच्या दैनंदिन जीवनातील स्वतःचे किंवा लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्यावर भर द्या यातूनच तुम्हाला एखादी नवीन बिझनेस आयडिया मिळेल.

आता आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल –

१) ओला कॅब कंपनी ( OLA CAB COMPANY ) :-

“भावेश अग्ग्रवाल” हा युवक एकदा टॅक्सी ने प्रवास करत होता, त्या प्रवासामध्ये  टॅक्सी वाल्याने त्याला चांगली सर्विस दिली नाही त्याला त्या ठिकाणी प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागला आणि त्या त्रासावर त्याने विचार केला आणि त्यावर उपाय म्हणून ओला कॅब या टॅक्सी सर्विस ची सुरुवात केली. 

२) रेड बस.कॉम (REDBUS.COM) :-

“फ़ॅनिंदर सामा” हा युवक सणासुदीच्या दिवसांमध्ये  सुट्टीच्या वेळी  आपल्या गावी जायला निगयचा त्यावेळी त्याला बस चे तिकीट मिळायचे नाही बऱ्याच वेळा त्याला गावी जाता येत नसे या प्रॉब्लेम वर त्याने असा उपाय काढला कि बस चे तिकीट “ऑनलाईन बुक” करता यावे आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्याने “redbus .कॉम” या कंपनी ची सुरुवात केली.

म्हणूनच असे बोलले जाते कि,

“”PROBLEM IS THE NEW BIG OPPORTUNITY””

म्हणजे “अडचणीतच नवीन संधी लपलेली असते.”

ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या ठिकाणी नवीन बिझनेस आयडिया आहेत.

जर तुम्हाला खूप मोठी कंपनी बनवायची आले तर तुम्हाला जास्त मोठा किंवा जास्त लोकांचा  प्रॉब्लेम सोडवावा लागेल, त्यामुळे तुमचा बिझनेस आणि प्रॉफिट पण जास्त होईल.

प्रश्न: तुमच्या डोक्यामधें कोणती बिझनेस आयडिया आहे ?

तर ते मला कंमेंट बॉक्स माडे लिहून पाठवा.

धन्यवाद …..!!!

Leave a Reply