कंपनीचे ब्रँड वचन म्हणजे काय ?

कंपनीचे ब्रँड वचन म्हणजे काय ?

ब्रँड हा फक्त चांगला लोगो, नाव किंवा जाहिरात या गोष्टींवर अवलंबून नसावा तर तो कंपनीच्या तत्त्वांवर अवलंबून असावा.

थोडक्यात काय तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना दिलेले एक वचन जे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पाळता अगदी तुमचे नुकसान झाले तरीही तुम्ही ते वचन पाळता. याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे ज्या वेळी ताज हॉटेलवर हल्ला झाला त्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले ते सर्व टाटा ग्रुप आणि रतन टाटा यांनी स्वतः जबाबदारी घेऊन त्यांना मदत केली.

उद्योजक मित्रानो अगदी सोप्याच भाषेत सांगायचे झाले तर हे दोन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा

  १) तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ठाम राहता ?

२) तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींमुळे ओळखले जाते ?

या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजेच तुमच्या कंपनीचे ब्रँड वचन होय.

उदाहरण :-

# डॉमिनोस पिझ्झा फक्त ३० मी. मध्ये नाहीतर फ्री.

आता तुम्हाला वाटत असेल कि हे ब्रँड वचन नेमके असावे तरी कसे…..

तर

 १) सहज शक्य न होणारे पण अश्यक्यही नसावे.

( थोडक्यात काय तर अवघड असावे )

२) लोकांना आकर्षित करणारे असावे.

३) लोकांना चांगले फीलिंग्स देणारे, आनंदी करणारे आणि त्यांच्या अडचणींवर फुंकर मारणारे असावे.

४) त्यामध्ये संख्यात्मक बोध असावा.

उदाहरणार्थ :-

३० मी मध्ये ( संख्यात्मक बोध ) पिझ्झा नाहीतर एकदम मोफत.

५) तसेच त्यामध्ये एखादी अट घातलेली असावी (म्हणजेच ३० मी. मध्ये पिझ्झा नाही आला तर फ्री )

६) शाब्दिक दृष्ट्या आकर्षित नसले तरी चालेल पण कार्यक्षम असावे.

७) ब्रँड वचनमध्ये सकारात्मक बोध असावा.

# आता आपण आणखी काही उदाहरणे पाहूया  –

१) मॅकडोनाल्ड – ३० सेक. मध्ये बर्गर.

२) मॅग्गी  – २ मी. मध्ये मॅग्गी.

३) २४*७ सर्विस – हॉटेल्स / मेडिकल्स / न्युज चॅनल्स

४) २४ ता. डिलिव्हरी ( एक्सप्रेस ) ऍमेझॉन.

आता आपण ‘ब्रँड वचन’ (Brand Promise) चे फायदे काय आहेत ते पाहूया –

१) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीला सोप्पे जाते.

२) कंपनीचे काम कार्यक्षम होण्यासाठी मदत होते.

३) कंपनीच्या कामामध्ये प्रगती होते.

४) काही प्रमाणात जाहिरातीचा खर्च कमी होतो.

थोडक्यात बोलायचे झाले तर….

जेव्हा तुम्ही विशिष्ट प्रकारची वस्तू किंवा सेवा पुरविण्याचे वचन देता आणि कोणत्याही परिस्तिथीमध्ये ते तंतोतंत पाळता.

तेव्हा मार्केट मध्ये तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होते आणि लोकांचा तुमच्या कंपनीवरचा विश्वास वाढायला लागतो.

त्यामुळे लोकांच्या / ग्राहकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सकारात्मक विचार किंवा अनुभव तयार होतो.

ग्राहकांना आलेला तोच सकारात्मक अनुभव परत-परत आठवतो आणि तो अनुभव ग्राहकांच्या मनामध्ये रुजू होतो.

–  आणि त्या विश्वासामुळे विशिष्ट प्रकारच्या अनुभवामुळे तो ग्राहक पुन्हा-पुन्हा तुमच्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेतो आणि तो ग्राहक स्वतःच तुमच्या वस्तू किंवा सेवेचे मार्केटिंग करायला लागतो. यालाच आपण ‘माऊथ पब्लीसिटी’ असे म्हणतो.

तर मित्रानो ब्रँड वचन हे तुम्ही एक व्यवसायाची मार्केईटिंग रचना ( स्ट्रॅटेजि )  म्हणून पण वापरू शकता.

वेळेनुसार / परिस्थितीनुसार ठराविक काळासाठी वापरू शकता आणि बदलू हि शकता.

तसेच कंपनी किंवा संस्थेच्या ब्रँड वचन प्रमाणे प्रत्येक माणूस व्यक्तिगत स्वतःचे देखील ब्रँड वचन तयार करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो.

### तर मित्रानो जर तुम्हाला तुमच्या कंपनी चे ध्येय , उद्दिष्ट ठरवून नवीन जोमाने व्यवसाय सुरु करायचा असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्याला या सर्व गोष्टी चे नियोजन करण्यास मदत करू.

चला तर फ्रेंड्स तुमचे ब्रँड वाचन काय आहे ?

 ते मला कंमेंट बॉक्स मध्ये फटाफट लिहून पाठवा.

 धन्यवाद…!!!

बिझनेस बाबा ”  

लोकांना सक्षम करणे, सक्षम समाज घडविणे

Leave a Reply