उद्योग मोठा कसा कराल ?

उद्योग मोठा कसा कराल ?

मोठी कंपनी म्हणजे वार्षिक उलाढाल जास्त. जास्त लोकांना वस्तू व सेवा पुरवणे आणि पिढयानपिढया चालणारी कंपनी तयार करणे असे आपण बोलू शकतो.

या ठिकाणी आपण काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत.तर मुख्य विषयाला हात घालण्याआधी उद्योजकाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, त्या पुढीलप्रमाणे…..

१ – सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उद्योजकाने कागदोपत्री व्यवहार केला पाहिजे.

२ – मोठा विचार करा, कमीत-कमी ५ वर्षे आणि जास्तीत-जास्त १५-२० वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार ठेवा.

३ – कंपनीची दिशा म्हणजे उद्दीष्टे ( व्हिसिओन & मिशन ) ठरवा आणि ते तुमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा.

४ – कंपनीला स्वयंचलित  ( AUTO MODE )  बनवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी कंपनीमध्ये “प्रणाली आणि प्रक्रिया” ( सिस्टिम & प्रोसेस ) तयार करण्यावर भर द्या.

५ – कंपनी मध्ये विक्रीचा विभाग चांगला करा आणि हुशार व कुशल लोकांना नोकरी द्या.

६ – कंपनी माणसांवर आधारित नसून “प्रणाली आणि प्रक्रिया

” ( सिस्टिम & प्रोसेस ) वर आधारित असावी.

७ – तुम्ही स्वतः व्यवसायाचे प्रशिक्षण घ्या आणि आपल्या लोकांना तयार करा.

८ – कंपनीचे आर्थिक नियोजन चांगले करा, तसेच ते करत असताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

९ – उद्योजकाचा  स्वभाव लवचिक असावा, त्याने स्वतः परस्थितीनुसार बदलून, कंपनीमध्ये गरजेनुसार बदल केले पाहिजेत.

१० – कंपनी जर पिढ्यानपिढ्या चालवायची असेल तर चांगल्या तत्वांवर आधारित कंपनी तयार करा.

 आता आपण कोण-कोणत्या प्रकारे बिझनेस मोठा करू शकतो ते पाहूया…..

 १) फ्रॅन्चायझी मॉडेल ( FRANCHISE MODEL ) :-

बिझनेस मोठा करण्याची ही सर्वात मोठी युक्ती आहे. शेअरिंग मध्ये उद्योग केल्याने तुमच्या कंपनीची विक्री वाढते, तसेच तुमचे कामाचे तास वाढतात.लोकांना चांगली सेवा भेटते. तुमचा ब्रँड तयार होतो, तर तुम्ही तुमच्या बिझनेसला लवकरात-लवकर “फ्रॅन्चायसी मॉडेल” मध्ये रूपांतरित करा. जिंका-जिंका    ( WIN-WIN SITUATION )  या तत्वावर काम करा. तुम्हीही फायदा कमवा  आणि तुमच्या सहकाऱ्याला ( BUSINESS PARTNER)  ला पण फायदा करून द्या. अन तुमचा बिझनेस वाढवा.

.उदाहरणार्थ :-

# मॅगडॉनल ( MACDONALDS )

# पिझ्झा हंट ( PIZZA HUT )

# के.एफ.सी. ( KFC )

# स्टार बक्स ( STARBUCKS )

 २ -प्रामाणिक सहकारी निवडा 

( MAKE A LOYAL CLIENTS & DISTRIBUTORS):-

तुमी वितरण प्रणाली ( डिस्ट्रिब्युटर नेटवर्क ) पण उत्कृष्ट तयार करा.त्यांना चांगली सेवा द्या  आणि फायदा मिळवून  द्या. मोठ्या आणि महत्वाच्या ग्राहकांच्या बरोबर चांगले नाते तयार करा. तसेच एका मागून एक अशा अनेक वस्तू किंवा सेवा त्यांना पुरवा. म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या उद्योगाला पूरक प्रॉडक्ट्स तयार करा आणि एकाच ग्राहकांना परत परत विका.

.उदाहरणार्थ :-

# मारुती सुझुकी ( MARUTI SUZUKI )

# कोका-कोला ( COKA-KOLA )

 ३ – विपणन ( MARKETING ):-

आज जगातील ९०-९५% कंपन्या मार्केटिंग वर विशेष लक्ष देतात. त्यावर वार्षिक जास्त खर्च करतात आणि ब्रँड तयार करतात. तुम्हीपण योग्य मार्केटिंग करून एक चांगला यशस्वी ब्रँड तयार करू शकता. सध्याच्या काळात सगळे जग ऑनलाईन झाले आहे त्यामुळे न्युज पेपर्स,   टी.व्ही, पेपर पॅम्फ्लेट्स अश्या जुन्या पद्धतींवर न अडकून राहता डिजिटल मार्केटिंग / सोशिअल मीडिया मार्केटिंगचा वापर करून घ्या, प्रामुख्याने यामध्ये फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट, ई-मेल मार्केटिंग हे सर्व येते. हे सर्व जर तुम्हाला करायला अवघड जात असेल तर तुम्ही हे डिजिटल मार्केटिंग एजंट कडून करून घ्या आणि तुमचा ब्रँड मोठा करा.

“” GOOD MARKEITING MAKES THE

COMPANY LOOK SMART,

GREAT MARKETING MAKES THE

 CUSTOMER FEEL SMART “”

 ४ – प्रतिक्रिया घेणे  /  पुनरावलोकन करणे  ( REVIEW / FEEDBACK ) :-

उद्योजकाने आपल्या कंपनीमध्ये प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया घ्यावी, महत्वाच्या प्रतिक्रिया फक्त तुम्ही घ्या. बाकीच्या सर्व जवबाबदाऱ्या वाटून टाका. तसेच संपूर्ण कंपनीत  पुरावलोकन  करण्याची व्यवस्था तयार करा. कर्मचाऱ्यांना तशी सवय लावा. त्यामुळे निर्णय योग्य होतात. वेळोवेळी चुका समजावून घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे सोपे जाते. तसेच यामुळे वेळेचे आणि पैश्याचे चांगले नियोजन होते . पैशाची बचत होते.

5 – नातेसंबंध चांगले करा ( MAKE GOOD RELATIONSHIP ) :-

 “”तुम्ही लोकांना घडवा, लोक तुमची कंपनी घडवतील “”

 तुम्ही तुमच्या कंपनीतील सर्व लोकांबरोबर चांगले नातेसंबंध तयार केले पाहिजेत. तसेच तुम्ही तुमच्या कामामधील जो काही अनुभव आहे तो  वेळोवेळी प्रसंगानुसार त्यांना सांगायला हवा. यामुळे कर्मचारी विश्वासू बनतात, कामाची कार्यक्षमता वाढते आणि चांगले मित्रत्वाचे वातावरण तयार होते. या सर्व गोष्टींमुळे व्यवसाय वाढण्यास मदत होते.

६ – संस्थेची रचना चांगली करा ( STRONG ORGANIZETIONL STRUCTURE ) :-

तुम्हाला जर स्वयंचलित संस्था बनावाची असेल आणि दीर्घ काळ कंपनी चालवायची असेल तर संस्थेची रचना चांगली करा. प्रत्येकाला एक हुद्दा द्या, त्याप्रमाणे त्याला त्याच्या जबाबदाऱ्या   सांगा, प्रत्येकाला त्याचे नेमके काम काय आहे ते माहित असले पाहिजे, तसेच कंपनीचे नियम व अटी पण माहित असल्या पाहिजेत. कंपनीचे उद्दिष्ट सर्वांना माहिती पाहिजे. लोकांच्या योग्यतेनुसार काम द्या.चांगले बुद्धिमान लोक तुमच्या कंपनीमध्ये भरती करा, चांगले काम केल्यास बोनस / बक्षीसे द्या. त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात काय तर कामाच्या जागेला एक सकारात्मक वातावरण तयार करा.

 ७ – उत्तम विक्री संघ तयार करा. ( DEVELOPEMENT OF SALES TEAM ) :-

विक्री करणारी टीम हि एक महत्वाची टीम मानली जाते, कारण कंपनीमध्ये जो काही पैसा येतो तो याच टीम च्या माध्यमातून येतो. तर त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्या, प्रेरणा द्या, कमिशन / बक्षीसे / बोनस आणि  चांगल्या सुखसुविधा द्या, म्हणजेच उत्तम विक्री टीम तयार करून तुमची विक्री वाढावा.

 ८ – पैसा उभा करा ( RAISE FUND ) :-

कंपनी मोठी करण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पैसा ( वित्तीय बळ ) होय. तर उद्योजकाचे कामच असते कि भविष्यातील वाढीसाठी पैसा उभा तकरणे. पैसा उभा करण्याचे काही मार्ग…….

– मित्रपरिवार आणि कुटुंबातील लोकांकडून पैसा उभा करणे.

– एंजेल इन्व्हेस्टर ( ANGLE INVESTORS ) कडून पैसे आणणे.

– व्हेंचर कॅपिटॅलिस्ट ( VENTURE CAPATALIST ) कडून पैसे आणणे.

– पार्टनरशिप ( PARTNERSHIP ) करणे.

– “आय.पी.ओ” ( IPO ) काढणे.

९ – विस्तारीकरण ( BRAND EXPANSION ) :-

नेहमी तुमचा ब्रँड प्रमोशन करत असताना ब्रँडचा विस्तार करणे हे डोक्यात ठेवा. तो वाढल्यानेच तुमच्या कामाचे क्षेत्र वाढणार आहे, तुमचा फायदा वाढणार आहे. त्यासाठी….

# फ्रॅन्चायझी मॉडेल तयार करा.

– कंपनी मालक, कंपनी चालक ( CO-CO)

– पार्टनर मालक, कंपनी चालक (FO-CO)

– पार्टनर मालक, पार्टनर चालक ( FO-FO )

 तर यामुळे तुमची वार्षिक उलाढाल वाढेल आणि कंपनी चा बाजार भाव वाढेल.

१०- ब्रँड वचन ( BRAND PROMISE) :-

‘ब्रँड वचन’ तयार करा आणि ते सर्व कर्मचाऱ्यांना पाळायला सांगा याची काही उदाहरणे पाहूया…….

 – डॉमिनोज पिझ्झा ३० मिनिट नाहीतर फ्री.

– एका वर्षांमध्ये घर तयार नाहीतर फ्री.

– ६० मिनिटात होम डिलिव्हरी नाहीतर ५०% डिस्काउंट.

– मोबाईल बिघडल्यास ‘बॉक्स ला बॉक्स’ बदलून मिळेल.

 ऐकण्यास सोपे पण करण्यास अवघड असावे असे वचन द्या, यामुळे कंपनी मधील लोकांची  कामाची कार्यक्षमता वाढते, तसेच ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही नव-नवीन कल्पनांचा शोध घेता,  नवीन व्यवस्था सुरु करता, मशिनरीमध्ये बदल करता.

 ११- चांगली मुल्ये तयार करा आणि वाढवा ( VALUE CREATION ) :-

तुम्ही जास्तीत जास्त भर कंपनीची मुल्ये वाढण्यासाठी दिला पाहिजे, लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागवणारे प्रॉडक्ट तयार केले पाहिजेत. चांगली सेवा देण्यावरच तुमचा भर असला पाहिजे, तरच तुम्ही जास्त काळापर्यंत मार्केट मध्ये टिकून राहू शकता.

१२ –  भागीदारांना जपा ( INVESTORS ):-

 इन्व्हेस्टरना जास्त चांगले रिटर्न्स मिळवून द्या म्हणजे ते अजून जास्त पैसे तुमच्या कंपनीमध्ये लावतील आणि तुमच्या कंपनीची वाढच होत राहील.

१३ – कंपनीमध्ये एक संस्कृती तयार करा( INTRODUCE CULTURE) :-

असे म्हटले जाते कि कोणत्याही कंपनीमध्ये चांगल्या सवयी ह्या वरील हुद्द्यावरून खाली  अनुसरल्या जातात. जर वरील हुद्द्यांवरचे अधिकारी चांगले वागत असतील तर सगळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतात, त्यामुळे उद्योजकाने कंपनीमध्ये चांगले वातावरण निर्माण करावे. आपल्या कंपनीची उद्दीष्टे वारंवार त्यांना सांगणे. कंपनीच्या तत्वांमध्ये तडजोड होता काम नये, नियम बनवावे आणि त्याचे सर्वांनी पालन करावे, चूक झाली तर समजावून सांगून अजून एक संधी द्यावी आणि चांगले काम केल्यास कौतुक  करून प्रेरणा द्यावी. शतकानुशतके कंपनी चालवायची असेल तर हे करणे अत्यंत गरजेचे आहे.

यातील जिवंत उदाहरणे म्हणजे

# टाटा ग्रुप.

# बी.व्ही.जि ग्रुप.

# कोटक ग्रुप.

१४ – वर्गीकरण करा ( COMPANY DIVISIONAL ) :-

शेवटी जेव्हा तुमची कंपनी मोठी होऊ लागेल तेव्हा तिचे वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण करा आणि प्रत्येक भाग वेगळा चालवा म्हणजे एक “ग्रुप ऑफ बिझनेस” तयार करा. प्रत्येक उपभागाला त्याच्या कामानुसार उद्दिष्टे द्या. यामुळे काय होते कि निर्णय चांगले होतात, काम उत्कृष्ट होते, पैश्याचे आणि वेळेचे चांगले नियोजन होते

# टाटा ग्रुप ऑफ बिझनेस

# रिलाईन्स ग्रुप ऑफ बिझनेस

हि याची उदाहरणे आहेत.

तर मी आशा व्यक्त करतो कि तुम्ही या माहितीच्या आधारे नक्कीच चांगला ब्रँड बनवाल.

प्रश्न : तुमच्या ब्रँड चे नाव काय आहे ?  तुम्ही कोणता ब्रँड बनवणार आहात ?

      हि माहिती कशी वाटली ?

मला कंमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद…!!!! “” बिझनेस बाबा “”

Leave a Reply