“व्हिडिओ सिक्रेट मास्टरक्लास” या कोर्समधून आपल्याला काय शिकवले जाणार.
मित्रानो “व्हिडिओ सिक्रेट मास्टरक्लास” या कोर्से मध्ये तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवणार आहात, विडिओ बनवण्याचे तंत्र शिकणार आहात आणि सन २०२० मध्ये अति महत्वाचे तंत्र शिकून तुम्ही विडिओ एक्स्पर्ट बनणार आहात.
चला तर मग या यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया.
तर मित्रानो आपल्याला २०२० मधील महत्वाचे तंत्र शिकून एक यशस्वी “डिजिटल लीडर” बनायचे असल्यास खाली दिलेल्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला यशस्वी बनवण्यास कटिबद्ध आहे.
Read Less
Hello Ladies & Gentleman,
This is vishal,
Son of caring mom of sweet family,
Hard working electrical engineer,
By heart public speaker & story teller,
CRAZY traveler,
Always ready to meet new human beings,
X merchant navy electrical officer,
Traveled 14 countries & 34 foreign cities,
Then back to back failed in 8 business,
Now a successful “Digital Lifestyle Entrepreneur”.
Founder of ibelieveacademy.in
My vision is to….
Help 10000 people to be a ‘Great Digital Leader’ by discovering their true potential and live a prosperous ‘digital lifestyle’.
आयुष्य हा ध्येयाकडे जाण्याचा प्रवास असतो. ध्येयामुळे जगण्यात झिंग येते जीवनाला अर्थ प्राप्त होतो माझ्या आयुष्याचा प्रवासही तसा आव्हानांचा सामना करत झाला आहे पण मी जीवनाकडे कधी नकारार्थी दृष्टीने पाहिले नाही. खरा आनंद हा यशप्राप्ती पेक्षा त्या यशासाठी केलेल्या संघर्षामध्ये असतो असे मला वाटते. फुलपाखरू होऊन स्वच्छंदी भरारी घेण्यासाठी सुरवंटाला देखील स्वतःच्या साधारण कक्षेतून बाहेर पडावे लागते. मी स्वतः नेहमीच अशी साधारण कक्षा ओलांडण्याचा प्रयत्न करत आलो आहे.
2003 साली मी दहावी उत्तीर्ण झालो आणि त्या लहान वयातही मला जबाबदारीचे भान आले पण मागील १० वर्षे निष्फळ गेली आहेत असे वाटू लागले. आत्तापर्यंत आपण विशेष काही केले नाही अशी बोचणी मनाला लागली. भविष्याविषयी आपल्यापुढे कोणते ध्येय नाही या विचाराने अपराधी वाटू लागले.
Read More
त्या अवस्थेतच मी स्वतःला तीन प्रश्न विचारले.........मी कोण आहे.?
मी आतापर्यंत काय केले आहे.?
भविष्यात मी काय करणार आहे.?
स्वतःचे अस्तित्व शोधू पाहणाऱ्या या प्रश्नांनी मला अस्वस्थ केले. मी पुरता बेचैन झालो. मेंदू आणि मनावर ताण आला होता. अचानक एके दिवशी "द सिक्रेट" हा व्हिडिओ मला पाहायला मिळाला. मला त्यातून माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत असल्याचा साक्षात्कार झाला. मी पुन्हापुन्हा तो व्हिडिओ पाहिला शेवटी मला त्यातून यशस्वी आयुष्याचा गुरुमंत्र सापडला तो म्हणजे 'मोठा विचार करा, मोठे यश मिळवा'.
हे सार होते त्या दिवसापासून मी कामाला लागलो मनामध्ये विश्वास होता, डोक्यामध्ये निश्चय होता आणि जीवनामध्ये यशस्वी बनण्याची व काहीतरी वेगळे करून दाखवण्याची भूक होती.
मित्रानो विचार मोठा केला पण भीतीपोटी "आय टी आय" चे शिक्षण घेण्याचा छोटा निर्णय घेतला. होय मित्रानो मी आय टी आय चा विद्यार्थी आहे, पण वेगळे काहीतरी करण्याची भूक मोट्ठी होती, ध्येयापरी वेडा झालो होतो हवी तेवढी मेहनत करायला तयार होतो घरच्यांनी देखील खूप साथ दिली आणि त्या भुकेपोटी रोज एक नवीन आव्हान समोर ठेवत गेलो, मी कधीच स्वतःला एका छोट्या कक्षेतमध्ये बांधून ठेवले नाही मी नेहमीच मोठी आणि कठीण स्वप्ने पाहायचो, प्रत्येकक्षणी विध्यार्थी दशेत राहून जे काही शिकता येईल ते शिकत गेलो हा संघर्ष करता-करता मुंबई युनिव्हर्सिटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअर झालो ( ते होण्यासाठी वडील जमीन देखील विकायला तयार होते, पण देवकृपेने ती वेळ अली नाही )
आता शिक्षणाचे स्वप्न तर पूर्ण झाले होते पण त्याआधीच एक मोट्ठे लक्ष मी माझ्यासमोर ठेवले होते, ते म्हणजे जॉब करायचा तर परदेशातच व लाखो रुपये कमवायचे प्रयत्न सुरु ठेवले आणि "मर्चन्ट नेव्ही" म्हणजे मालवाहतूक जहाजमध्ये 'इलेक्ट्रिकल ऑफिसर' या पदावरती नोकरीला लागलो, काही वर्षातच महिना २.५ ते ३ लाख पगार भेटू लागला, त्यामध्ये १४ देश आणि परदेशातील 3४ वेगवेगळी शहरे फिरायला भेटली, पण काहीतरी अजून कमी आहे असे वाटत होते, खोल समुद्रामध्ये असताना मनामध्ये विचार यायचा कि आज आपण एकटेच एवढे पैसे कमवतोय.... का नाही आपण अनेक लोकांना घेऊन पैसे कमाऊ शकणार ??? एका नवीन विचारला पालवी फुटली होती मनात कुठेतरी व्यवसाय करायचा असे बीज रोवले गेले होतेच आणि त्यालाच खत पाणी घालायला मी सुरुवात केली.
एके दिवशी मी जहाज वरती मध्य समुद्रामध्ये असताना सायंकाळी सूर्यास्ताची वेळ झाली होती, दूर नजर गेली तर निळे पाणी आणि भगवे-लाल आकाश गळाभेटी घेत होते. हातामध्ये कॉफीचा मग घेऊन मी जहाजाच्या पाठीमागच्या बाजूला एकटाच बसलो होतो तेव्हा अचानक मला व्यवसाय का करायचा ? याचा उद्देश भेटला आणि तो म्हणजे "लोकांना सक्षम करणे,सक्षम समाज घडविणे"
मला माहित होते या निर्णयाचे कोणीच समर्थन करणार नाही, पण नेहमीप्रमाणेच मला अवघड निर्णय घ्यायला आवडतात, पहिला अर्धांगिनीला सांगितले आणि जॉब सोडला, वेड्यासारखे जे पडेल ते काम, जो भेटेल तो व्यवसाय करायला सुरुवात केली कारण व्यवसाय करणे तर लांबच तो आधी शिकायचा होता आणि शेवटी ८ व्यवसायामध्ये अयशस्वी झाल्यानंतर मला माझी आवड, खूप साऱ्या चुका करून घेतलेला अनुभव व काळाची गरज या तीन गोष्टींचा मेळ लागणारा व्यवसाय करायचा मी निर्णय घेतला आणि आज एक यशस्वी 'डिजिटल लाईफस्टाईल एन्टरप्रिन्युर" म्हणून काम करत आहे.
'लोकांना सक्षम करणे, सक्षम समाज घडवणे" हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मला १०००० लोकांना त्यांच्या मधील कौशल्य शोधून यशस्वी डिजिटल जीवनशैली जगण्यास मदत करायची आहे.
त्याचबरोबर या डिजिटल युगामध्ये डिजिटल लीडर्स तयार करायचे आहेत की जे उद्या आपल्या भारताला सक्षम बनवतील.
Read Less
तुम्ही यशासाठी भुकेले असायला हवे, तुमच्या आयुष्यामध्ये काही तत्वे (VALUES) असली पाहिजेत जसे कि सत्य, अविष्कार, ग्राहक सेवा, बदल आणि विश्वास हि माझी तत्वे आहेत, तर नक्कीच तुम्ही देखील एक दूरदृष्टी ठेऊन मोठा आदर्शवत व्यवसाय उभा करू शकता.
माझ्या मते पहिली कृती म्हणजे तुम्ही तुमचे मनाचे प्रोग्रामिंग बदलायला पाहिजे कारण मनाच्या प्रोग्रामिंगमुळे विचार तयार होतात, विचारांमुळे भावना प्रकट होते, भावनेवरती कृती अवलंबून असते तर योग्य कृतीमुळे तुम्हाला यशस्वी फळ मिळते, म्हणून मनाचे प्रोग्रामिंग हे तुमच्या यशस्वी आयुष्याचे मूळ आहे आणि मी देखील जेव्हा यावरती काम केले तेव्हाच माझे आणि माझ्याबरोबर असलेल्या लोकांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
Vishal provided us with an excellent professional service tailored specifically to our needs. He showed great attention to detail and delivered for us exactly what we were looking for.
Vishal helped us take our first steps in digital marketing. He is knowledgeable and delivered as quoted. We were happy with the results. Thanks Vishal.